#समानता_सर्वसमावेशकता_समरसता_आणि_जेवण
मी सध्या (६-डिसेंबर-१७) ओरिसा मध्ये आलो आहे. एकटा प्रवास करतोय ... मी ९०% प्रवास एकट्यानेच केला आहे. आणि सध्या अनेक दिवसापासून विचारपीठ या FB page वर वाचन / लिखाण / चर्चा करतो आहे.
मी मागे चीन ला गेलो होतो ( April'१४... २५ दिवस > Main land China, ५ दिवस सिंगापूर ) २५ दिवस राहिल्या मूळे आणि हॉटेल पेक्षा मित्राच्या घरी राहिल्या मूळे मला हॉटेल, मीटिंग conference, exhibition पलीकडील चीन पाहायला मिळाला. तेव्हा मला एका वेगळ्याच विचारसरणीच्या देशात आलो आहे असे खूप वाटत होते . या trip मुळे मी प्रश्न विचारायला शिकलो. आपण खरच भारतीय आहोत का कि आपण अमेरिकन युरोपियन गुलाम आहोत ? आपण भारतीय विचार करतो का? लोकशाही, व्यक्तीस्वतंत्र, समानता या व अनेक कल्पना भारतीय कल्पना आहेत का ? आपण स्वाभिमानी आहोत का ? आपण Google, Facebook, Microsoft अशा अमेरिकन कंपनी च्या मागे का आहोत ? आपल्या कडे चीन प्रमाणे Baidu, Tencent सारख्या कंपन्या का तयार होत नाहीत ? समाजवाद कि भांडवल शाही , अंबानी कि कल्याणकारी योजना, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात.. किंवा पडतातच म्हणा ना.. तुम्ही जर चीन ला जाऊन आलात तर तुम्हाला युरोप / अमेरिकेबद्दल राग येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय, म्हणजे अमेरीकन + युरोपीय... त्यात भारतीय काही नाही.. असे वाटू लागू शकते. कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे भारतीय नाही असे वाटू लागू शकते. म्हणजे मग International Court, UNO, UNESCO, WTO, WHO यांच्या कार्याबद्दल एक सुप्त राग निर्माण होऊ शकतो.
थोडक्यात सांगायचे तर मला आपल्या देशाच्या सद्य स्वभावाबद्दल एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले .. !
जाऊदे हे झाले चीन आणि आपल्या भारत देशा बद्दल..
पण हाच प्रकार विचारपीठ या FB ग्रुप बद्दल म्हणता येईल.
या ग्रुप मुले मला अनेक प्रश्न आपल्या संस्कृती बद्दल, आपल्या परंपरांबद्दल, आपल्या समजुती, माझ्या स्वभावाबद्दल पडू लागले..
अनेक गोष्टीची चिकित्सा करू लागलो. नक्की खरे काय ? खोटे काय ? कि सगळे मायाजाल आहे ?
स्व: सभावाबद्दल चिकित्सक वृत्ती निर्माण झाली..
मला विचार पीठ वर आल्या पासून अनेक प्रश्न पडले .. त्यातील महत्वाचे प्रश्न म्हणजे .. जातीय द्वेष, समानता, संविधान, भारतीय कायदा वगैरे..
यातील समानता बद्दल मला आज लिहावेसे वाटत आहे.
मला जिथे जाऊ तिथे तिकडील पदार्थ खावेसे वाटतात. म्हणजे ओरिसा मधे मला उत्तम पोखाल (Water Rice), छेनापोड वगैरे शोधून खायला आवडेल... सध्या अशा शोध मोहिमेमध्ये मी नेहमीच फसत आलो आहे. म्हणजे उत्तम... मूळ (Authentic का काय म्हणतात ते) चवीची ठिकाणे सापडणे खूप कठीण असते.. पिझा खावा तर पिझा हट मधीलच नाहीतर पोपट पोंगा होण्याची खूप शक्यता असते. असे पोपट पोंगे बाहेर गेलात तर माझे नेहमी होतात.. खूप मोठा पोपट झाला कि रामबाण उपाय इडली डोसा किंवा उत्तपा खाणे...
तर मी आज (६-Dec-१७) रोजी कोणार्क, पुरी, ओरीसा मध्ये पोखाल शोधात होतो. आणि माझा खूप मोठा पोपट झाला एका ठिकाणी खूप तिखट जाळ पोखाल मिळाला... त्याच हॉटेल मध्ये बसून विचार करता करता हे सुचले आणि इथेच बसून लिहीत आहे...
आपण सगळे जण समानता समानता म्हणतो .. घटने मध्ये पण समानता हा विषय येतो.. त्यासाठी आरक्षण आर्थिक मदत वगैरे अनेक वेगवेगळे उपाय आपण केले आहेत..
पण संघ (रा. स्व. संघ) कधीच समानता असे म्हणत नाही ते नेहमी समरसता असे म्हणतात .. बरोबर ..?
आता हा लेख मी नेते पुढारी यांची मते न वाचता लिहित आहे.. म्हणजे मला भावलेला जो विचार / अर्थ आहे ते पाहून लिहित आहे.. (नेते लोकांचा विचार घेऊन परत revise करता येईल.)
समानता म्हणजे काय ? Standardization ? सर्वांनी समान विचार करणे समान राहणे एकमेकाना समानतेची वागणूक देणे..
आता विचार करा सगळी कसे समान जेवण आणि पदार्थ मिळाले तर चालतील का ? म्हणजे सगळी कडे फक्त आणि फक्त पंजाबीच जेवण मिळेल किंवा फक्त केरळी जेवण मिळेल असे म्हणालो तर चालेल का ? सगळीकडे फक्त तोतापुरी आंबा मिळेल असे झाले तर चालेल का ?
ते शक्य आहे का ? खाद्य पदार्थात समानता कशी येईल ?
हीच गोष्ट अनेक गोष्टींना लावता येईल जसे पेहराव, भाषा.. वगैरे..
जर भारत देशात ४-५ लाख खेडी असतील.. त्यातील २-३ लाख खेडेगावात ग्राम दैवत असतील तर मला सांगा २-३ वेगवेगळ्या परंपरा आहेत सर्वाना एकत्र कसे आणणार ? समानता कशी होणार ? समानतेची व्याख्या बदलावी कि काय ?
आता एक पहा तुम्ही पंजाबी आहात .. जगात कुठेही गेलात तरी पंजाबी जेवण जेवत असाल तर ..? तुम्ही समानता पाळता का ? या प्रकाराला काय म्हणावे ?
आणि जर तुम्ही अयोध्या, काशी म्हणजे उत्तर प्रदेशात गेलात आणि तिकडे पण पंजाबी जेवण शोधले तर ? अयोध्येमध्ये चिट्टी लोखा, ओरिसा मध्ये पोखाल, केरळ मध्ये पोंगल भात .. असे पदार्थ शोधून खाल्ले तर ? त्याला समावेशकता म्हणता येईल का ? म्हणजे मी माझ्या पंजाबी जेवणात काही जागा अयोध्या ची चव, ओरिसाची चव, केरळी चव यांना दिली बरोबर ..? म्हणजे मी इतरांना माझ्या मनात सामावून घेतले बरोबर का ?.. म्हणजे माझा स्वभाव विशाल झाला का ? व्यक्ती सृष्टी समष्टी .. कि काय म्हणतात ते हेच का ?
आणि ह्याचा पुढे म्हणजे मुंबई. तिकडे काही काही भन्नाट पदार्थ मिळतात जसे नूडल्स डोसा, शेझवान राईस डोसा ... वगैरे हे म्हणजे चीनी व दक्षिण भारतीय समरसता झाली असे म्हणायचे का ?
Mauritius मधे क्रेउल नावाची भाषा आहे ती भाषा फ्रेंच, हिंदी, भोजपुरी, मराठी व काही प्रमाणात इंग्रजी अशा सर्व भाषांची मिसळ भाषा आहे. ह्याला काय म्हणता येईल ? हि समरसता, सर्वसमावेशकता, समानता कि खिचडी कि आणखीन काही ..?
विविधता हा निसर्गाचा नियम आहे. नाहीतर जगात एकाच फळ असते ... किंवा एकाच झाड असते एकाच प्राणी असता .. फळ झाड प्राणी कशाला एकच सजीव असता ...
पण ...
निसर्गात ८४ लाख वेगवेगळे सजीव प्राणी आहेत म्हणजेच विविधता आहे ...
ते नष्ट करणे म्हणजे निसर्गाच्या सोबत कि विरोधात ?
विचार करा...!
आपले मत मांडा ..!
ताक : मी पुढारी महापुरुषांचे समानता यावरील मत वाचले नाहीये..
मला आंबेडकर, सावरकर, गांधी यांची मते कळली तर लेखात आवश्यक ते बदल करता येतील...

No comments:
Post a Comment