आजी आजोबा असताना आमचे घर म्हणजे ना गजबजलेला वाडाच असे.. आजोबा त्याचे मित्र.. आजी तिच्या मैत्रिणी भजनी मंडळ.. आई बाबा यांचे मित्र.. संघाचे, कल्याण आश्रमाचे, विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते विज्ञान भारतीच्या बैठका.. काहीना काही घरी नेहमीच चालत असे.. कोणी ना कोणी जेवायला पाहुणे कार्यकर्ते असणार.. गंमत काय असे की तेव्हा इथे संघाचे कार्यालय नव्हते आणि आमचे घर बस स्टँड जवळ त्यामूळे कोणी ना कोणी मुक्कामी जेवायला असे ह्यामूळेच आमचे लहानपण अगदी अगदी अनेक लोकांच्या सहवासात गेले... मस्त धमाल..
त्यामूळे घरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतलेला.. माझे बाबा तर दोन्ही कार सेवेला जाऊन आलेले.. असो...
अशा वातावरणात कोणी शांत बसू शकेल का.. नाही ना.. काही ना काही चालूच प्रत्येकाचे.. त्यात आम्ही पडलो odd man out एकाही काम धड न करणारे.. पण सर्व कामात उत्साहाने भाग घेणारे.. आताशी माझा लहान भाऊ पण भारतात नसला तरी जोरदार सक्रिय आहे.. HSS च्या शाखा घेणे वेग वेगळे कार्यक्रम आयोजित करणे.. ह्यात तो जोरदार पटाईत झाला आहे..
तर मूळ विषयाकडे येतो माझे काका निवृत्त (retired हो) झाल्या पासून अनेक ठिकाणी फिरून आले.. त्याची इच्छा होती की रामदेव बाबा, योगी अरविंद, रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र अशा अनेक ठिकाणी जाऊन यायचा विचार आणि मग कोणत्या तरी ठिकाणी काही दिवस पूर्णवेळ म्हणून काम करावे असा विचार...
याच विचाराने त्यांनी ठरवले की आपण विवेकानंद केंद्राचे एक शिबीर करूया... तर ते सकाळी सकाळी तात्काळ तिकीट काढायला गेले होते पुणे स्टेशन वर... आणि तिकीट काढून आले.. आणि छान काका काकू आणि बहुतेक त्याचे काही ओळखीचे असे सगळे गेले शिबिराला कन्याकुमारी येथे.. तिथे महिला पुरुष अशी वेगळी व्यवस्था होती.. त्यामूळे काका काकूंची भेट होत नव्हती.. बहुतेक २/३ दिवसांनी काकांना ताप आला.. काही केल्या थांबेना आणि मग श्वास घ्यायला थोडा त्रास होऊ लागला... त्यांनी मलेरिया न्युमोनिया असे उपचार सुरू केले.. पण ताप काही थांबेना... उपचार चालू होते आणि काकू इतर कोणाला काही तसे कळले नव्हते.. पण नंतर एका दिवशी त्रास खूप वाढला आणि कफ मधून रक्त पडले तेव्हा मात्र डॉक्टर आणि सगळेच घाबरले.. काकूला बोलावले... तात्काळ flight book करून थेट दीनानाथ मंगेशकर मध्ये Infections Disease मध्ये admit... माझी आते बहिन आणि भाऊजी डॉक्टर आहेत.. बहिणीने एक्सरे पाहिल्या पाहिल्या temiflu सुरू केली..
भाऊजी Infectious Disease मधेच डॉक्टर असल्याने त्यांनी पण तात्काळ ventilator सुरू केले... मी हॉस्पिटल मध्ये सोबत होतो तेव्हा माझ्याकडे 3310 फोन होता.. मला पल्स रेट, ईसीजी, SPO2 असे पाहायला सांगितले होते.. मुख्यतः SPO2 म्हणजे शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण.. घरी अनेक डॉक्टर असल्याने मी थोडा बिनधास्त होतो. मी दर १५/२० मिनिटांनी भाऊजी ना SPO2 लेवल चा एसएमएस करत असे..
तेव्हा कफ मधून रक्त पडत होते.. वगैरे..
बहुतेक २/३ दिवसानी काकांनी #गुलवेल_सत्व घेणे सुरू केले होते..
आणखीन तपासण्याचे निकाल यायचे बाकी होते..
आणि अचानक निकाल आला स्वाइन फ्लू म्हणून..
तेव्हा पर्यंत स्वाइन फ्लू वर उपचार सापडला नव्हता बहुतेक..
Immunity वाढवणे WBC Count वाढवणे आणि एक्सरे इतकेच हातात होते..
पण तरी दीनानाथ मधील उपचार गूळवेल आणि सर्वांची मेहनत यांनी खरेच काका हळू हळू बरे होऊ लागले.. दिवसा गणिक एक्सरे मध्ये सुधारणा दिसू लागली..
नंतर विचारले तर भाऊजी म्हणे काका खूप क्रिटिकल condition मधून बाहेर आलेत.. आणि इतक्या फास्ट रिकवरी त्यांनी पण पहिली नव्हती...
संपूर्ण पणे बरे व्हायला जेथे लोकांना २/३ वर्षे पण लागू शकतात तिथे काका ४/५ महिन्यात बरेच ठीक (recover) झाले होते...
असा हा #गूळवेल_महिमा..
आता तर आम्ही घरी गुळवेल चा वेल लावला आहे..
आता बर्याचदा आमच्या घरी गुळ वेलाच्या काड्या असतात येता जाता बाबा म्हणतात एक तुकडा खा..
काका नी तर गूळ वेल यावर बराच अभ्यास बरेच अनुभव घेतले आहेत.. राजस्थान, बीकानेर येथील गूळ वेल सर्वांत प्रभावी असावा असे त्यांना वाटते...
तर मग वाचन केले की कळले गुळवेल diabetes वर पण उपयुक्त आहे. सर्व प्रकाराच्या viral fever वर, आणि एक जबरदस्त immunity booster आहे.
आणि तसे पाहिले तर गुळवेल इकडे तिकडे कुठे पण येतो..
जाता येता कुठे दिसले की एका काडी पाने आणयाला काहीच हरकत नसावी..
हळद तुळस गुळवेल असा १/४ काढा करून पिला रोज तर प्रतिकार शक्ती छान वाढेल आणि शक्यतो कोणताच आजार होणार नाही....!!!!!
#गुळवेल #गिलोय
- ©पुष्कर हेमंत जोशी

