Friday, September 22, 2023

जात

 

आज पोस्त वर उत्तर देता देता एक सुंदर पोस्ट तयार झाली ..
Main target must be convert VS into AND
जात = Group = गट = संघ = महासंघ हे समाजात राहणारच ते कधीच संपणार नाहीत आणि ते व्यावहारिक पण नाही... फक्त त्यांचे स्वरूप बदलत जाणार...
जसे जसे छोट्या गावाकडून तुम्ही मोठ्या शहराकडे जाल तसे तसे बदललेले स्वरूप तुम्हाला जाणवेल ...
गावात तुम्हाला ब्राह्मण गल्ली दिसेल तर मुंबई मध्ये तुम्हाला दिसणार नाही
मुंबई मध्ये तुम्हाला नेवी नगर दिसेल किवा आरे / LIC कॉलोनी दिसेल ...
जसा जसा काळ पुढे पुढे सरकत जाईल तसा तसा हा बदल होत जाणार
गावात तुम्हाला
ब्राह्मण VS मराठा
तालुक्याला
हिंदू VS मुस्लीम
शहरात तुम्हाला
मुंबईकर VS घाटी, Engineer VS B. com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
असा जातीयवाद = Groupism
नक्की दिसेल ..
आपण groupism संपवू शकत नाही तो कोणत्या न कोणत्या स्वरुपात राहणारच !!
आपण फक्त VS ला AND मध्ये बदलू शकतो
ब्राह्मण VS मराठा, हिंदू VS मुस्लीम, मुंबईकर VS घाटी, Engineer VS B.com, मराठी vs गुजराथी , शाकाहारी vs मांसाहारी
ला ब्राह्मण AND मराठा, हिंदू AND मुस्लीम, मुंबईकर AND घाटी, Engineer AND B.com, मराठी AND गुजराथी , शाकाहारी AND मांसाहारी
असे बदलू शकतो ..
विचार करा .. Indian Medical Association किंवा Institute of Engineer's किंवा कालां घोडा students association याना आपण group वादी (जातीय वादी) म्हणालो तर कसे होईल ..
जात / group / संघटना नष्ट करा म्हणालो तर कसे होईल ?
समाजात Indian medical association हे राहणारच त्याचे महत्व आहेच .. पण तुम्ही त्यास Institute of Engineer's मध्ये merge करा असे म्हटले तर चालेल का ?
प्रत्येक संस्था प्रत्येक जात प्रत्येक संघटना प्रत्येक गट (group) याचे समाजात काही न काही तरी योदादन असतेच ते आपण नाकारू शकत नाही ..
गरज आहे तर फक्त VS ला AND मध्ये बदलण्याची !!

Monday, March 23, 2020


आजी आजोबा असताना आमचे घर म्हणजे ना गजबजलेला वाडाच असे.. आजोबा त्याचे मित्र.. आजी तिच्या मैत्रिणी भजनी मंडळ.. आई बाबा यांचे मित्र.. संघाचे, कल्याण आश्रमाचे, विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते विज्ञान भारतीच्या बैठका.. काहीना काही घरी नेहमीच चालत असे.. कोणी ना कोणी जेवायला पाहुणे कार्यकर्ते असणार.. गंमत काय असे की तेव्हा इथे संघाचे कार्यालय नव्हते आणि आमचे घर बस स्टँड जवळ त्यामूळे कोणी ना कोणी मुक्कामी जेवायला असे ह्यामूळेच आमचे लहानपण अगदी अगदी अनेक लोकांच्या सहवासात गेले... मस्त धमाल..
त्यामूळे घरातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतलेला.. माझे बाबा तर दोन्ही कार सेवेला जाऊन आलेले.. असो...
अशा वातावरणात कोणी शांत बसू शकेल का.. नाही ना.. काही ना काही चालूच प्रत्येकाचे.. त्यात आम्ही पडलो odd man out एकाही काम धड न करणारे.. पण सर्व कामात उत्साहाने भाग घेणारे.. आताशी माझा लहान भाऊ पण भारतात नसला तरी जोरदार सक्रिय आहे.. HSS च्या शाखा घेणे वेग वेगळे कार्यक्रम आयोजित करणे.. ह्यात तो जोरदार पटाईत झाला आहे..
तर मूळ विषयाकडे येतो माझे काका निवृत्त (retired हो) झाल्या पासून अनेक ठिकाणी फिरून आले.. त्याची इच्छा होती की रामदेव बाबा, योगी अरविंद, रामकृष्ण आश्रम, विवेकानंद केंद्र अशा अनेक ठिकाणी जाऊन यायचा विचार आणि मग कोणत्या तरी ठिकाणी काही दिवस पूर्णवेळ म्हणून काम करावे असा विचार...
याच विचाराने त्यांनी ठरवले की आपण विवेकानंद केंद्राचे एक शिबीर करूया... तर ते सकाळी सकाळी तात्काळ तिकीट काढायला गेले होते पुणे स्टेशन वर... आणि तिकीट काढून आले.. आणि छान काका काकू आणि बहुतेक त्याचे काही ओळखीचे असे सगळे गेले शिबिराला कन्याकुमारी येथे.. तिथे महिला पुरुष अशी वेगळी व्यवस्था होती.. त्यामूळे काका काकूंची भेट होत नव्हती.. बहुतेक २/३ दिवसांनी काकांना ताप आला.. काही केल्या थांबेना आणि मग श्वास घ्यायला थोडा त्रास होऊ लागला... त्यांनी मलेरिया न्युमोनिया असे उपचार सुरू केले.. पण ताप काही थांबेना... उपचार चालू होते आणि काकू इतर कोणाला काही तसे कळले नव्हते.. पण नंतर एका दिवशी त्रास खूप वाढला आणि कफ मधून रक्त पडले तेव्हा मात्र डॉक्टर आणि सगळेच घाबरले.. काकूला बोलावले... तात्काळ flight book करून थेट दीनानाथ मंगेशकर मध्ये Infections Disease मध्ये admit... माझी आते बहिन आणि भाऊजी डॉक्टर आहेत.. बहिणीने एक्सरे पाहिल्या पाहिल्या temiflu सुरू केली..
भाऊजी Infectious Disease मधेच डॉक्टर असल्याने त्यांनी पण तात्काळ ventilator सुरू केले... मी हॉस्पिटल मध्ये सोबत होतो तेव्हा माझ्याकडे 3310 फोन होता.. मला पल्स रेट, ईसीजी, SPO2 असे पाहायला सांगितले होते.. मुख्यतः SPO2 म्हणजे शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण.. घरी अनेक डॉक्टर असल्याने मी थोडा बिनधास्त होतो. मी दर १५/२० मिनिटांनी भाऊजी ना SPO2 लेवल चा एसएमएस करत असे..
तेव्हा कफ मधून रक्त पडत होते.. वगैरे..
बहुतेक २/३ दिवसानी काकांनी #गुलवेल_सत्व घेणे सुरू केले होते..
आणखीन तपासण्याचे निकाल यायचे बाकी होते..
आणि अचानक निकाल आला स्वाइन फ्लू म्हणून..
तेव्हा पर्यंत स्वाइन फ्लू वर उपचार सापडला नव्हता बहुतेक..
Immunity वाढवणे WBC Count वाढवणे आणि एक्सरे इतकेच हातात होते..
पण तरी दीनानाथ मधील उपचार गूळवेल आणि सर्वांची मेहनत यांनी खरेच काका हळू हळू बरे होऊ लागले.. दिवसा गणिक एक्सरे मध्ये सुधारणा दिसू लागली..
नंतर विचारले तर भाऊजी म्हणे काका खूप क्रिटिकल condition मधून बाहेर आलेत.. आणि इतक्या फास्ट रिकवरी त्यांनी पण पहिली नव्हती...
संपूर्ण पणे बरे व्हायला जेथे लोकांना २/३ वर्षे पण लागू शकतात तिथे काका ४/५ महिन्यात बरेच ठीक (recover) झाले होते...
असा हा #गूळवेल_महिमा..
आता तर आम्ही घरी गुळवेल चा वेल लावला आहे..
आता बर्‍याचदा आमच्या घरी गुळ वेलाच्या काड्या असतात येता जाता बाबा म्हणतात एक तुकडा खा..
काका नी तर गूळ वेल यावर बराच अभ्यास बरेच अनुभव घेतले आहेत.. राजस्थान, बीकानेर येथील गूळ वेल सर्वांत प्रभावी असावा असे त्यांना वाटते...
तर मग वाचन केले की कळले गुळवेल diabetes वर पण उपयुक्त आहे. सर्व प्रकाराच्या viral fever वर, आणि एक जबरदस्त immunity booster आहे.
आणि तसे पाहिले तर गुळवेल इकडे तिकडे कुठे पण येतो..
जाता येता कुठे दिसले की एका काडी पाने आणयाला काहीच हरकत नसावी..
हळद तुळस गुळवेल असा १/४ काढा करून पिला रोज तर प्रतिकार शक्ती छान वाढेल आणि शक्यतो कोणताच आजार होणार नाही....!!!!!
#गुळवेल #गिलोय


- ©पुष्कर हेमंत जोशी

Saturday, March 10, 2018

आजी आजोबा सोबत असणे म्हणजे एक आनंद सोहळाच असतो..!

ते कोणत्याही कारणाने सोबत असलो तरी..
कोणत्याही कठीण परिस्थिती मध्ये आजी आजोबा खूप खंबीर आणि खूप आनंदी असतात. जुन्या पिढी कडे काहीतरी खरच मानसिक आध्यात्मिक शक्ती आहे हेच खरे.
प्रचंड अनुभवांचा खजिना प्रचंड उत्साह आणि इतरांचा कंटाळा दूर करण्याची अद्भुत शक्ती असते आजी आजोबां कडे.
आपण छोट्या छोट्या कारणाने कंटाळून जातो थकतो बोर होतो. जरी आपल्या कडे अनेक नव नवीन साधने आहेत माहितीचा महापूर आहे. ERCP म्हणजे काय हे आपल्याला मिनिटात सापडेल त्याचा व्हिडीयो वगैरे, endoscopy काय laparoscopy त्यातील फरक काय हे आपल्याला पटकन कळेल.
पण प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहायचे आजूबाजूला आनंदी वातावरण कसे ठेवायचे ही कला नवीन पिढी कडे नसावी किंवा आता लोप पावत चालली आहे असेच खेदाने म्हणावेसे वाटते.
आजी आजोबा even माझी आई आज पर्यंत रागावलेली चिडलेली मी पाहीली नाहीये कुठून येते ही अशी महाप्रचंड शक्ती.
आपण लगेच काही झाले की कंटाळा तरी येतो नाहीतर चिडतो तरी.. राग व्यक्त नाही केला तरी मनातून तरी चिडतो बोर होतो थकतो उदास होतो पण हेच कधीच मी आजी आजोबा आई ह्याच्या सोबत पाहीले नाहीये..
भरपूर पैसा मोठे घर गाडी आणि भौतिक सुविधा हया आज आपण मिळवतो किंबहुना मिळवणे खूप सोपे झाले असावे पण सोबतच आपण दूर दूर रहातो सहवास कमी ओळख कमी.. एकटे दुकटे रहाण्याची सवय कोणतीही गोष्ट पैशाने मिळण्याची सोय. त्यामुळे एकत्र काम करण्याची गंमत हरवत चालली आहे की नाही.. कामा (job) निमित्त दूर दूर जाणे राहणे यामूळे आपण माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे हे विसरूनच चाललो आहोत की काय असे वाटते.
अनेक कुटुंबे दिवाळीच्या निमित्ताने तरी एकत्र भेटत असतिल पण किती लोकांकडे एकत्र फराळ करतात (म्हणजे बनवतात). आता काय सगळे बिझी विकत आणा आणि खा.
..
खूप काही लिहावेसे वाटत आहे पण शब्द सुचत नाहीयेत..
नवीन पिढीतील किती लोकांना हवी तेव्हा सुट्टी घेता येते..? घरातील सर्व कार्यात भाग घेता येतो..? मनमोकळे पणाने ....?
कारण काय ते सापडत नाहीये मला वाटते नवीन पिढी कडे वेळ नाहीये का..?
एकत्र येणार कधी मग ओळख होणार कधी मग...?
आपणास काय वाटते कसा अनुभव आलाय?
हा फक्त माझाच अनुभव आहे की आणखीन कोणाला असेच वाटते..?
मनात आले तसे लिहीले..!
हे मला लिहीते करण्यासाठी विचारपीठ, श्रीनिकेत देशपांडे व अनेक वेगवेगळे फेसबूक लेखक.. यांची प्रेरणा आहे..
Photo बदल : आजोबांना gallbladder stone साठी hospital मध्ये अ‍ॅडमिट केले आहे. एंडोस्कोपी झाली, त्यातून काढणे कठीण म्हणून आता लेप्रोस्कोपी चा विचार आहे..
साध्या मी सोबत आहे.. पण उत्साह पहा त्यांनी स्वतःच असा फोटो काढायला सांगितला..
सूर्य खूप छान दिसत होता. पण फ्लॅश घेतला की सूर्य गायब आणि फ्लॅश नाही घेतला की चेहरा गायब असे होत होते त्यामुळे दुसर्‍या फोनचा continuous flash वापरला.. बराच वेळ प्रयत्न केला तेव्हा कुठे हा पिक मिळाला.

- Pushkar Hemanta Joshi



Wednesday, December 6, 2017

#समानता_सर्वसमावेशकता_समरसता_आणि_जेवण

#समानता_सर्वसमावेशकता_समरसता_आणि_जेवण

मी सध्या (६-डिसेंबर-१७) ओरिसा मध्ये आलो आहे. एकटा प्रवास करतोय ... मी ९०% प्रवास एकट्यानेच केला आहे. आणि सध्या अनेक दिवसापासून विचारपीठ या FB page वर वाचन / लिखाण / चर्चा करतो आहे.

मी मागे चीन ला गेलो होतो ( April'१४... २५ दिवस  > Main land China, ५ दिवस सिंगापूर ) २५ दिवस राहिल्या मूळे आणि हॉटेल पेक्षा मित्राच्या घरी राहिल्या मूळे मला हॉटेल, मीटिंग conference, exhibition पलीकडील चीन पाहायला मिळाला.  तेव्हा मला एका वेगळ्याच विचारसरणीच्या देशात आलो आहे असे खूप वाटत होते . या  trip मुळे मी प्रश्न विचारायला शिकलो. आपण खरच भारतीय आहोत का कि आपण अमेरिकन युरोपियन गुलाम आहोत ? आपण भारतीय विचार करतो का? लोकशाही, व्यक्तीस्वतंत्र, समानता  या व अनेक कल्पना भारतीय कल्पना आहेत का ? आपण स्वाभिमानी आहोत का ? आपण  Google, Facebook, Microsoft अशा अमेरिकन कंपनी च्या मागे का आहोत ? आपल्या कडे चीन प्रमाणे Baidu, Tencent सारख्या कंपन्या का तयार होत नाहीत ? समाजवाद कि भांडवल शाही , अंबानी कि कल्याणकारी योजना, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात.. किंवा पडतातच म्हणा ना..  तुम्ही जर चीन ला जाऊन आलात तर तुम्हाला युरोप / अमेरिकेबद्दल राग येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय, म्हणजे अमेरीकन + युरोपीय... त्यात भारतीय काही नाही.. असे वाटू लागू शकते. कोणतीही आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे भारतीय नाही असे वाटू लागू शकते. म्हणजे मग International Court, UNO, UNESCO, WTO, WHO यांच्या कार्याबद्दल एक सुप्त राग निर्माण होऊ शकतो.

थोडक्यात सांगायचे तर मला आपल्या देशाच्या सद्य स्वभावाबद्दल एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले .. !

जाऊदे हे झाले चीन आणि आपल्या भारत देशा बद्दल..
पण हाच प्रकार विचारपीठ या FB ग्रुप बद्दल म्हणता येईल.
या ग्रुप मुले मला अनेक प्रश्न आपल्या संस्कृती बद्दल, आपल्या परंपरांबद्दल, आपल्या समजुती, माझ्या स्वभावाबद्दल पडू लागले..
अनेक गोष्टीची चिकित्सा करू लागलो. नक्की खरे काय ? खोटे काय ? कि सगळे मायाजाल आहे ?
स्व: सभावाबद्दल चिकित्सक वृत्ती निर्माण झाली..

मला विचार पीठ वर आल्या पासून अनेक प्रश्न पडले .. त्यातील महत्वाचे प्रश्न म्हणजे .. जातीय द्वेष, समानता, संविधान, भारतीय कायदा वगैरे..

यातील समानता बद्दल मला आज लिहावेसे वाटत आहे.

मला जिथे जाऊ तिथे तिकडील पदार्थ खावेसे वाटतात. म्हणजे ओरिसा मधे मला उत्तम पोखाल (Water Rice), छेनापोड वगैरे  शोधून खायला आवडेल... सध्या अशा शोध मोहिमेमध्ये मी नेहमीच फसत आलो आहे. म्हणजे उत्तम... मूळ (Authentic का काय म्हणतात ते) चवीची ठिकाणे सापडणे खूप कठीण असते.. पिझा खावा तर पिझा हट मधीलच नाहीतर पोपट पोंगा होण्याची खूप शक्यता असते. असे पोपट पोंगे बाहेर गेलात तर माझे नेहमी होतात.. खूप मोठा पोपट झाला कि रामबाण उपाय इडली डोसा किंवा उत्तपा खाणे...

तर मी आज (६-Dec-१७) रोजी कोणार्क, पुरी, ओरीसा मध्ये पोखाल शोधात होतो. आणि माझा खूप मोठा पोपट झाला एका ठिकाणी खूप तिखट जाळ पोखाल मिळाला... त्याच हॉटेल मध्ये बसून विचार करता करता हे सुचले आणि इथेच बसून लिहीत आहे...

आपण सगळे जण समानता समानता म्हणतो .. घटने मध्ये पण समानता हा विषय येतो.. त्यासाठी आरक्षण आर्थिक मदत वगैरे अनेक वेगवेगळे उपाय आपण केले आहेत..
पण संघ (रा. स्व. संघ) कधीच समानता असे म्हणत नाही ते नेहमी समरसता असे म्हणतात .. बरोबर ..?

आता हा लेख मी नेते पुढारी यांची मते न वाचता लिहित आहे.. म्हणजे मला भावलेला जो विचार / अर्थ आहे ते पाहून लिहित आहे.. (नेते लोकांचा विचार घेऊन परत revise करता येईल.)

समानता म्हणजे काय ? Standardization ? सर्वांनी समान विचार करणे समान राहणे एकमेकाना समानतेची वागणूक देणे..
आता विचार करा सगळी कसे समान जेवण आणि पदार्थ मिळाले तर चालतील का ? म्हणजे सगळी कडे फक्त आणि फक्त पंजाबीच जेवण मिळेल किंवा फक्त केरळी जेवण मिळेल असे म्हणालो तर चालेल का ?  सगळीकडे फक्त तोतापुरी आंबा मिळेल असे झाले तर चालेल का ?
ते शक्य आहे का ? खाद्य पदार्थात समानता कशी येईल ?
हीच गोष्ट अनेक गोष्टींना लावता येईल जसे पेहराव, भाषा.. वगैरे..
जर भारत देशात ४-५ लाख खेडी असतील.. त्यातील २-३ लाख खेडेगावात ग्राम दैवत असतील तर मला सांगा २-३ वेगवेगळ्या परंपरा आहेत सर्वाना एकत्र कसे आणणार ? समानता कशी होणार ? समानतेची व्याख्या बदलावी कि काय ?

आता एक पहा तुम्ही पंजाबी आहात .. जगात कुठेही गेलात तरी पंजाबी जेवण जेवत असाल तर ..? तुम्ही समानता पाळता का ? या प्रकाराला काय म्हणावे ?
आणि जर तुम्ही अयोध्या, काशी म्हणजे उत्तर प्रदेशात गेलात आणि तिकडे पण पंजाबी जेवण शोधले तर ? अयोध्येमध्ये चिट्टी लोखा, ओरिसा मध्ये पोखाल, केरळ मध्ये पोंगल भात .. असे पदार्थ शोधून खाल्ले तर ? त्याला समावेशकता म्हणता येईल का ? म्हणजे मी माझ्या पंजाबी जेवणात काही जागा अयोध्या ची चव, ओरिसाची चव, केरळी चव यांना दिली बरोबर ..? म्हणजे मी इतरांना माझ्या मनात सामावून घेतले बरोबर का ?.. म्हणजे माझा स्वभाव विशाल झाला का ? व्यक्ती सृष्टी समष्टी .. कि काय म्हणतात ते हेच का ?

आणि ह्याचा पुढे म्हणजे मुंबई. तिकडे काही काही भन्नाट पदार्थ मिळतात जसे नूडल्स डोसा, शेझवान राईस डोसा ...  वगैरे हे म्हणजे चीनी व दक्षिण भारतीय समरसता झाली असे म्हणायचे का ?
Mauritius मधे क्रेउल नावाची भाषा आहे ती भाषा फ्रेंच, हिंदी, भोजपुरी, मराठी व काही प्रमाणात इंग्रजी अशा सर्व भाषांची मिसळ भाषा आहे. ह्याला काय म्हणता येईल ? हि समरसता, सर्वसमावेशकता, समानता कि खिचडी कि आणखीन काही ..?

विविधता हा निसर्गाचा नियम आहे. नाहीतर जगात एकाच फळ असते ... किंवा एकाच झाड असते एकाच प्राणी असता .. फळ झाड प्राणी कशाला एकच सजीव असता ...
पण ...
निसर्गात ८४ लाख वेगवेगळे सजीव प्राणी आहेत म्हणजेच विविधता आहे ...
ते नष्ट करणे म्हणजे निसर्गाच्या सोबत कि विरोधात ?

विचार करा...!
आपले मत मांडा ..!




ताक :  मी पुढारी महापुरुषांचे समानता यावरील मत वाचले नाहीये..
मला आंबेडकर, सावरकर, गांधी यांची मते कळली तर लेखात आवश्यक ते बदल करता येतील...  




   

   

Monday, July 11, 2011

माझी पंढरपूरची वारी

तसा मी नास्तिकच पण कोणासही विरोध नाही...... तर आषाढी एकादशी निमित्त दर वर्षी प्रमाणे आम्ही चौघे जण Wagnor मधून वारीला निघालो. संभाजीनगर जवळ (औरंगाबाद) पंढरपूर नावाचे एक गाव आहे १० कि मी तिथे आमची वारी निघाली. सकाळी ६-३० वा निघालो व ७ वा पोहोचलो. बाबा कार पार्किंग साठी चांगली जागा शोधायला निघाले आम्ही पुढे निघालो .... नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी आम्हाला वाटले २-३ तास लागणार.... इथे पुरुष व महिलांची रांग वेगवेगळी होती पण गर्दीला गती होती...... पुरुषांची रांगेत मोकळे पण होता तर महिला उगाचच गर्दी लोटालोटी करीत होत्या ... त्यामुळे महिलाच्या रांगेत खूप घनता होती ... १ च्या जागी ४ जणी उभ्या होत्या तर त्याच वेळेस इकडे २ जणाच्या जागी १ जण उभा होता .... मधेच काही भजनी मंडळ भजने म्हणत होती तिकडे पोलीस उगाचंच ढकला ढकली करीत होते.... तिकडे mic वर .... महिलांनी हळद कुंकू वाहू नये ही नम्र विनंती ... कोणी पान फुल वाहू नये .. लहान मुलांना सांभाळा ... उगाच लोटालोटी करू नका ..... वगैरे वगैरे अशा अनेक नम्र विनंत्या तावा तावात देत होते...... महिलांची गर्दी भरपूर वाढतच होती...... तेवढ्यात बाबा गाडी park करून आले. त्यामुळे मी व भाऊ .. आई .. व बाबा असे सगळे जण वेग वेगळ्या ठिकाणी होते . . . . . गाभाऱ्यात सोडताना महिला व पुरुषांना मोजूनच सोडत होते . . . . त्यामुळे महिलांची रांग वाढतच चालली होती. २-३ ठिकाणी काठ्या लावून गर्दीला नियंत्रित करीत होते ...... महिलांची गर्दी पाहून एका ठिकाणी (माझ्या मागे) पुरुषांची रांग थांबवून दोन्ही रांगा महिलांच्या केल्या त्या मुळे माझ्या मागे सर्व महिला वर्ग आला..... गंमत अशी की आता त्या गर्दी करत नव्हत्या ..... जेव्हा आम्ही गाभाऱ्यात गेलो तेव्हा गंमतच झाली. सगळ्या महिलांना काय उत्साह आला कोणास ठाऊक परत ढकला ढकली रेटारेटी सुरु...... आणि मला ढकलून दिले बाजूला पण गमत अशी झाली कि उंची मुळे मी छान दर्शन घेत होतो फक्त कोपऱ्यातून .... मी जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण गर्दी मला काही जाऊ देईना ...... आणि मी महिलांची रांग संपू स्तोवर म्हणजे १/२ तास साधारण मंदिरातील गाभाऱ्यात (शांतपणे ?) उभा होतो ...... विठोबा रखुमाईचे दर्शन घेत होतो ...... खरंच जिथे १-२ सेकंद पण दर्शन घेणे अशक्य होते तिथे मी अर्धा तास होतो...?! देव आहे का नाही ते माहित नाही पण योगायोग तर नक्कीच आहे ... मीच का ? असे माझ्या बरोबर आणखीन १-२ वेळेस झाले आहे तरी मी अजून नास्तिकच आहे..... खरंच ?

हे सगळं अनुभवून मला असे म्हणावेसे वाटते

ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम !!! .......